Wikipedia

Search results

Monday, 22 September 2014

आ गया फिर से चुनाव

Written By: SUNILKUMAR PARIT

आ गया फिर से चुनाव

अब पाँच साल गुजर गये
आ गया फिर से चुनाव
अब शायद नेता फिर से बनेंगे
भिखारी भिखारी भिखारी ॥

अब देखो तलवे भी चाटेंगे
सच पैरों तले गिडगिडायेंगे
खुद को सेवक और कहे राजा
जनता जनता जनता ॥

नादान जनता चुनती इनको
बाद में देखे हाल ही उलटा
भिखारी बनते हैं राजा सब देखे
तमाशा तमाशा तमाशा ॥

पूछें ऐसा क्यों वक्त का नजारा
जनता के पास नहीं है जवाब
भिखारी नहीं बोलेंगे अब वे हैं
शासक शासक शासक ॥

अब वे इतने ईमानदार हैं यारों
सबकुछ निगलकर ऐसे खडे हैं
तोंद हाथी सा अब पाँच साल सोयेंगे
कुंभकर्ण कुंभकर्ण कुंभकर्ण ॥

अब फिर से वही रट लगायेंगे
गिडगिडायेंगे रोयेंगे हम सहेंगे
बेहतर है अब दिखा दे अंतिम
संसार संसार संसार ॥

Sunday, 21 September 2014

मन वढाय वढाय

poet Bahinabai Chaudhari
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर ।
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।

मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा ।
जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।

मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? ।
उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।

मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे ।
इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।

मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?।
आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।

मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर ।
तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।

मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना ।
मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥

देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात ।
आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥

देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं ।
कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥

अरे, संसार संसार

poet Bahinabai Chaudhari

अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर !

अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं

अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !

अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड

अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे

ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन्‌ दुःखाले होकार

देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !

अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार

असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार !

आज मला खूप एकट वाटतय

आज मला खूप एकट वाटतय.,

कुणाच्या तरी जवळ
 बसावस वाटतय...,

कोणाशी तरी खूप खूप
 बोलावस वाटतय...,

अन मनात चाललेल सगळ
 काही सांगावस वाटतय...

आज परत एकदा तिला
 पहावस वाटतय...,

आज मला खूप खूप
 रडावस वाटतय....,

स्वतःशी परत खूप
 भांडावस वाटतय...,

भरलेल्या डोळ्याने...,

आरश्या समोर
 बसावस वाटतय...,

अन् आपलं कोणीच
 नाही म्हणून..स्वतःचेच
 डोळे पुसावंस वाटतय...,

आज मला परत भूत-काळात
 जावस वाटतय..परत एकदा
 आठवणींत जगावस वाटतय..

Saturday, 20 September 2014

स्वाभिमान

राजकारणात पाठीशी उभारा ,
कुणालाही पाठींबा द्या ,
पण स्वत:चा स्वाभिमान कुठे विकू नका ……
कारण , स्वाभिमान विकला  गेला तर,
जनावरात आणि आपल्यात फरक राहणार नाही …।

Friday, 19 September 2014

तुझी साथ


स्वप्न पाहिलं एक ,
तुझी साथ हवी सुरेख ,
                                        तुझ्या प्रेमाचा तो रंग  जसा,
                                      त्याने उमटवला हृदयावर ठसा ,
 थोडस जवळ आहेस वाटतंय ,
पण , हळूच दुरावा जाणवतोय ,
                                             आज खरच वेडा झालोय ,
                                              सगळे जग आज भूललोय ,
खूप सहन करतोय दुरावा ,
वाटतंय , तुझा हात-हाती हवा ,
                                                वेळ जात  आहे खूप अवघड ,
                                                 तुझ्या भेटीची लागलीय ओढ ,
मला आज-आता समोर हवीस …
थोड लाजत लाजत , पण ,
माझ्याकडे बघावीस …….


Thursday, 6 March 2014

शिवाजी महाराज आणि मुसलमान

लक्ष देउन वाचा....

महाराजांचं चित्र रंगवलेलं असतं की शिवाजी महाराज अफझल खानाचे पोट फाडत आहेत.... आणि खाली लिहिलेले असतं, दहशतवाद असाच संपवावा लागेल…

मराठ्यांच्या डोक्यात फिट कि मुसलमान मारल्याशिवाय दहशतवाद संपत नाही ….

आम्ही मराठा  बंधुना  समजावून सांगतो की शिवाजी महाराजांनी अफझल खानाचे पोट
फाडले.... हे खरे आहे…. पण अफझल खानाचे पोट फाडल्यानंतर कृष्णाजी भास्कर
कुलकर्णी मारलेला तुम्हाला का कळत नाही? याच्यावर चर्चा का होत नाही ?

शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होते असे चित्र का निर्माण केले जाते? कारण चारी बाजूंनी मुसलमान राजे महाराजांचे विरोधक होते…. पण मुसलमान राजे होते म्हणून काय शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होतात काय?

औरंगजेबाच्या सैन्यामध्ये हिंदू नव्हते काय? मिर्झा राजे काय मुसलमान होता काय? औरंगजेबाने आपले चार भाऊ मारून टाकले ते काय हिंदू होते काय? आपल्या बापाला अटक केली तो काय हिंदू होता काय?
या सर्व सत्तेच्या लढाया असतात हे आम्ही रोज समजावून सांगतो….

शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता?
इब्राहीम खान...

शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता?
दौलत खान…

शिवाजी महाराजांच्या घोडदलाचा प्रमुख कोण होता?
सिद्दी हिलाल...

शिवाजी महाराजांचा पहिला सर-सेनापती कोण होता?
नूर खान….

शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर….

शिवाजी महाराजांचा एकमेव वकील?
काझी हैदर...

शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव?
मीर मोहम्मद...

आणि शिवाजी महाराजांना अफझल
खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून देणारा?
रुस्तुमे जमाल...

एवढे जर मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असू शकतात काय?

शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड होते त्या पैकी 10 मुसलमान होते आणि बॉडी गार्ड काय करू शकतो हे इंदिरा गांधी ला जाऊन विचारा….

शिवाजी महाराजांनी एक हि मस्जिद पाडली नाही. एकही  कुराण जाळले नाही. मग शिवाजी महाराजांचे नाव मुसलमानांवर हल्ले करताना का वापरले जाते? याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे….

रायगड किल्ला राजधानी बांधल्या नंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले. महाराजांनी मंत्र्याला विचारले जगदीश्वराचे मंदिर बांधले पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे?
मंत्र्याने विचारले महाराज जागा दाखवा ….
महराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील
जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली … हा इतिहास
आपल्या देशात का सांगितला जात नाही ?…. हा इतिहास
जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक दुरी निश्चित
नाहीशी होईल ….
आज महाराष्ट्रात एक आंदोलन चालू आहे कुठले ? … जय
शिवाजी !अन पाडा कबर !… कोणती कबर ?
रायगडाच्या पायथ्याशी अफझल खानची कबर ….
आम्ही पोरांना रोज सांगतो … कबर पाडा पण
बांधली कोणी ? … अफझल खानाला मारल्यानंतर
शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले …… जिजाऊनि विचारले
अफझल खानाचे काय झाले ? महाराज उत्तरले मासाहेब
अफझल खान मारला गेला …. त्याचं प्रेत कुठ आहे ? ….
प्रतापगडाच्या पायथ्याशी …. काय म्हणाल्या जिजाऊ ?
…. शिवबा अफझल खान जिवंत असे पर्यंत त्याच्याशी वैर
होते अफझल खान संपला(मेला ) आता वैर हि संपले …. अन
तुज्या राज्यात कोण्या प्रेताला कोल्हया-कुत्र्याने
तोडावे हे शोभणार नाही …. त्याच्या प्रेताचे सन्मानाने
दफन कर …आणि तुज्या विजयाचे प्रतिक म्हणून तेथे स्मारक
बांध …। . शिवाजी महाराजांनी अफझल खानच्या प्रेताचे
प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले व तेथे त्याची कबर
बांधली. ती तोडुन  आपण  शिवरायांना चुकिचे ठरवणार आहोत लक्ष देउन वाचा....

महाराजांचं चित्र रंगवलेलं असतं की शिवाजी महाराज अफझल खानाचे पोट फाडत आहेत.... आणि खाली लिहिलेले असतं, दहशतवाद असाच संपवावा लागेल…

मराठ्यांच्या डोक्यात फिट कि मुसलमान मारल्याशिवाय दहशतवाद संपत नाही ….

आम्ही मराठा  बंधुना  समजावून सांगतो की शिवाजी महाराजांनी अफझल खानाचे पोट
फाडले.... हे खरे आहे…. पण अफझल खानाचे पोट फाडल्यानंतर कृष्णाजी भास्कर
कुलकर्णी मारलेला तुम्हाला का कळत नाही? याच्यावर चर्चा का होत नाही ?

शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होते असे चित्र का निर्माण केले जाते? कारण चारी बाजूंनी मुसलमान राजे महाराजांचे विरोधक होते…. पण मुसलमान राजे होते म्हणून काय शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होतात काय?

औरंगजेबाच्या सैन्यामध्ये हिंदू नव्हते काय? मिर्झा राजे काय मुसलमान होता काय? औरंगजेबाने आपले चार भाऊ मारून टाकले ते काय हिंदू होते काय? आपल्या बापाला अटक केली तो काय हिंदू होता काय?
या सर्व सत्तेच्या लढाया असतात हे आम्ही रोज समजावून सांगतो….

शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता?
इब्राहीम खान...

शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता?
दौलत खान…

शिवाजी महाराजांच्या घोडदलाचा प्रमुख कोण होता?
सिद्दी हिलाल...

शिवाजी महाराजांचा पहिला सर-सेनापती कोण होता?
नूर खान….

शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर….

शिवाजी महाराजांचा एकमेव वकील?
काझी हैदर...

शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव?
मीर मोहम्मद...

आणि शिवाजी महाराजांना अफझल
खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून देणारा?
रुस्तुमे जमाल...

एवढे जर मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असू शकतात काय?

शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड होते त्या पैकी 10 मुसलमान होते आणि बॉडी गार्ड काय करू शकतो हे इंदिरा गांधी ला जाऊन विचारा….

शिवाजी महाराजांनी एक हि मस्जिद पाडली नाही. एकही  कुराण जाळले नाही. मग शिवाजी महाराजांचे नाव मुसलमानांवर हल्ले करताना का वापरले जाते? याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे….

रायगड किल्ला राजधानी बांधल्या नंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले. महाराजांनी मंत्र्याला विचारले जगदीश्वराचे मंदिर बांधले पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे?
मंत्र्याने विचारले महाराज जागा दाखवा ….
महराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील
जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली … हा इतिहास
आपल्या देशात का सांगितला जात नाही ?…. हा इतिहास
जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक दुरी निश्चित
नाहीशी होईल ….
आज महाराष्ट्रात एक आंदोलन चालू आहे कुठले ? … जय
शिवाजी !अन पाडा कबर !… कोणती कबर ?
रायगडाच्या पायथ्याशी अफझल खानची कबर ….
आम्ही पोरांना रोज सांगतो … कबर पाडा पण
बांधली कोणी ? … अफझल खानाला मारल्यानंतर
शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले …… जिजाऊनि विचारले
अफझल खानाचे काय झाले ? महाराज उत्तरले मासाहेब
अफझल खान मारला गेला …. त्याचं प्रेत कुठ आहे ? ….
प्रतापगडाच्या पायथ्याशी …. काय म्हणाल्या जिजाऊ ?
…. शिवबा अफझल खान जिवंत असे पर्यंत त्याच्याशी वैर
होते अफझल खान संपला(मेला ) आता वैर हि संपले …. अन
तुज्या राज्यात कोण्या प्रेताला कोल्हया-कुत्र्याने
तोडावे हे शोभणार नाही …. त्याच्या प्रेताचे सन्मानाने
दफन कर …आणि तुज्या विजयाचे प्रतिक म्हणून तेथे स्मारक
बांध …। . शिवाजी महाराजांनी अफझल खानच्या प्रेताचे
प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले व तेथे त्याची कबर
बांधली. ती तोडुन  आपण  शिवरायांना चुकिचे ठरवणार आहोत का ?

प्रत्येकाचे डोळे ऊघडे पर्यंत पाठवत चला. ?

प्रत्येकाचे डोळे ऊघडे पर्यंत पाठवत चला.

Sunday, 2 March 2014

राजाराम महाराज

२ मार्च १७००- छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यु. .... स्मृतीस ञिवार वंदन...
राजाराम हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. छञपती संभाजींच्या मृत्युनंतर (१६८९ ते १७००) मराठी स्वराज्याचा अतिशय अवघड काळात त्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सरदारांच्या साहाय्याने नेतृत्त्व केले. कारकिर्दीतील त्यांनी मोठा कालखंड त्यांनी तामिळनाडूतील जिंजी येथे व्यतीत केला व स्वराज्याची धुरा सांभाळली. इ.स. १७०० मध्ये पुण्याजवळील सिंहगड येथे त्यांचा मृत्यु झाला.     सोबत : Original Photo.

Saturday, 1 March 2014

Love You sister

एक बहिण असावी.
मोठी ,लहान , शांत ,खोडकर
कशीही असावी पण एक बहिण असावी.
मोठी असेल तर आई बाबांपासून वाचवणारी,
लहान असेल
तर आपल्या पाठीमागे लपणारी.
मोठी असल्यास गुपचूप
आपल्या pocket मध्ये पैसे ठेवणारी. लहान असल्यास
चुपचाप काढून घेणारी.
लहान असोवा मोठी,
छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी. एक बहिण
प्रत्येकाला असावी.
मोठी असल्यास आपलं चुकल्यावर कान ओढणारी.
लहान
असल्यास
तिचं चुकल्यावर "sorry दादा " म्हणणारी.
लहान असोवा मोठी आपल्या एकाध मैत्रिणीला "वहिनी "
म्हणून हाक
मारणारी.
एक बहिण प्रत्येकाला असावी.
मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा shirt
आणणारी, लहान असल्यास प्रत्येक पगारात
आपल्या खिशाला चंदन
लावणारी.
ओवाळणी काय
टाकायची हे
स्वतः ठरवत असली तरीही तितक्याच ओढीने
राखी पसंत
करून आणणारी. एक बहिण प्रत्येकाला असावी. कठीण
प्रसंगी खंबीर राहील स्त्री शक्तीच ती ,
स्वतः पेक्षा हि जास्त आपल्यावर प्रेम
करणारी प्रत्येकाला एक
बहिण असावी......!!!

Friday, 28 February 2014

Jiddi shrikant Jichkar

श्रीकांत जिचकार
एकच माणूस डॉक्टर होता,
तो वकिलही होता,
तो आयपीएस
अधिकारी
तसंच आयएएस अधिकारी होता.

याशिवाय
तो पत्रकारही होता.
इतकंच नाही तो किर्तनकार, आमदार,
खासदार आणि मंत्रीही होता.

इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे""- श्रीकांत जिचकार""
होय.
"श्रीकांत जिचकार" यांचं नाव आज पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

जिचकारांचा 2004 साली अपघाती मृत्यु झाला आहे.
याप्रकऱणी आज कोर्टाने एसटी महामंडळाला जबाबदार धरलं
आहे. तसंच जिचकार यांच्या कुटुंबियांना 50 लाख 67 हजार रुपयांची नुकसान
भरपाई देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

शैक्षणिक क्षेत्रातील ‘महामेरू’ म्हणून संबोधता येईल, असं नाव म्हणजे
श्रीकांत जिचकार होय.
अवघ्या 49 वर्षांचं जीवन, 42
विद्यापीठं, 20 पदव्या आणि 28 सुवर्णपदकं
असा ज्ञानाचा खजिना या अवलियाने जिंकला.

आयएएस असो वा आयपीएस, एलएलएम
असो वा एमबीबीएस, देशातील बहुतेक सर्वच
पदव्यां मिळवण्याचा विक्रम श्रीकांत जिचकार यांच्या नावावर जमा आहे.
जिचकारांनी मिळवलेल्या 20 पदव्यांमध्ये
एमबीबीएस आणि एमडी,
एलएलबी, एलएलएम, डीबीएम
आणि एमबीए, जर्नालिझम यांचा समावेश आहे.

जिचकरांनी 10 विषयांत एम ए केलं. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र,
अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉपी,
राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्व,
मानसशास्त्र यांचा समावेश आहे.

जिचकारांनी संस्कृतमध्ये मानाची डी.लिट
ही पदवी मिळवली.
जिचकारांनी मिळवलेल्या बहुतेक पदव्या या प्रथम श्रेणीतून
मिळवल्या आहेत.
श्रीकांत जिचकार यांची भारतातील सर्वात शिक्षित
व्यक्तींच्या पक्तिंत गणती होते.
या ज्ञानयोगी चैतन्याच्या झऱ्याने,
ज्ञानदेवता सरस्वतीलाही अक्षरश: मोहून टाकलं. त्यामुळेच
आपल्या अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एकही वर्ष
वाया जाऊ न देता, बहुतेक सर्व पदव्यांवर नाव कोरलं.

जिचकार यांनी 1978
साली यूपीएससीची पर
यामध्ये त्यांनी अपेक्षित यश मिळवून आयपीएस झाले. पुढे
दोनच वर्षात म्हणजे 1980
साली त्यांनी आयएएसची पदवी खि
टाकली.
जिचकार यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये ५२,००० पुस्तकांचा संग्रह आहे.
विधानसभेची निवडणूक
लढवण्यासाठी त्यांनी आयएएसचा राजीनामा दिला.

या बुद्धिवंताने वयाच्या 25 व्या वर्षी पहिली सार्वत्रिक
निवडणूक लढवली आणि जिंकून दाखवली. जिचकार महाराष्ट्र
विधानसभेमध्ये १९८० साली वयाच्या २५ व्या वर्षी निवडून
गेले. महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेलेले ते सर्वांत तरुण सभासद होते.
जिचकारांनी १२ वर्षे विधानसभेमध्ये काम केले.
एकेकाळी त्यांच्याकडे १४ खात्यांचा कारभार होता.
यानंतर त्यांनी राज्यसभेवरही धडक मारली.
१९९२ साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली.
जिचकार १९९८ सालापर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. या काळामध्ये
त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले.
त्यांनी युनो आणि युनेस्को संघटनांसाठी ही काम
केले.
सलाम या आवलीयास...


Wednesday, 12 February 2014

शिवराय कविता

वाघासारखी डरकाळी द्यायला नुसत वाघ
असून चालत नाही
त्यासाठी अंगात शिवाचा अंश
असावा लागतो …
रणांगणात उतरून नुसती हाताची मुठ
वळवून चालत नाही
त्यासाठी आई भवानीचा आशीर्वाद
असावा लागतो..
अरे लढाया खुल्या मैदानात असोत
किंवा खवळलेल्या सागरात
जिंकण्यासाठी सह्याद्रीसारखा कणा ताठ
असावा लागतो ..
स्वराज्य उभ करायचं म्हणजे खायचं काम
न्हाय
त्यासाठी रक्ताचा अभिषेक
करावा लागतो..
लढण म्हणजे नुसत प्राण तळहातावर घेवून
चालण न्हवे
त्यासाठी शत्रू सोडाच
त्याच्या घोड्यालाही पाण्यात दिसावं
लागतं..
आग्राहून सुटका..
आणि शास्तेखनाची फजिती..
अहो राजा होण्यासाठी
अफजाल्यासारख्या
पाप्याला वाघासारख फाडावं लागतं..
वाघाच्या घुरघुरण्याला डरकाळीच महत्व
यायला
माझ्या राजांसारख
रयतेचा वाली छत्रपती शिवाजी राजे
असावं लागतं…

बाबासाहेब आम्बेडकर आणि मराठा

बाबासाहेब आंबेडकर
आणि मराठा समाज यांचे
जिव्हाळ्याचे नाते **
त्यातील काही निवडक गोष्टी.....
1:-
महाडच्या चवदार
तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर
जावून
शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले
आणि त्यांच्या सोबत
असलेल्या कार्यकर्त्यानी "जय
शिवरायच्या" घोषणा दिल्या.
बाबासाहेबांनी महाड
चवदार तळ्याच्या सत्यागृहाची सुरुवात
शिवरायांचे
दर्शन घेवून केली.
2:-
बेळगाव येथे शिवरायांच्या ३००
व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहूने
म्हणून डॉ.
बाबासाहेब आंबेडकर उपस्थितहोते.
3:-
बाबासाहेब आंबेडकर पत्र
लिहतांना पत्राची सुरुवात
"जय शिवराय" लिहून करत होते.
महाराष्ट्र शासनाने
हि पत्रे प्रकाशित केलेली आहेत.
4:-
ज्या मनुस्मृती या विषमतावादी ग्रंथामुळे
शिवरायांचा राज्याभिषेक
ब्राम्हणांनी नाकारला होता.
तो मनुस्मृती हा ग्रंथ
बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळून
शिवरायांच्या अपमानाचा बदला घेतला.
5:-
बाबासाहेब आंबेडकर लहान
असतांना "कृष्णराव अर्जुन
केळुस्कर" गुरुजींनी त्यांना "बुद्ध चरित्र"
भेट दिले
होते.
या चरित्रामुळे
बाबासाहेबांना धर्मांतराची प्रेरणा मिळाली.
केळुस्कर गुरुजी जन्माने"मराठा" होते.
6:-
छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब
आंबेडकर
"बैरीस्टर" झाल्यावर, त्यांची कोल्हापूर
शहरात
रथातून मिरवणूक काढून फुले
उधळली होती.
7:-
राजा सयाजीराव गायकवाड
यांनी बाबासाहेबांना परदेशात
शिक्षणासाठी सहाय्य
केले होते.
सयाजीराव गायकवाड जन्माने
मराठा होते.....
जय जिजाऊ...
जय शिवराय....
जय ज्योतीराव.....
जय शाहु महाराज......
जय अण्णाभाऊ........
जय भिमराय................

Tuesday, 11 February 2014

Father बाप

ही कविता कोणी लिहिली माहित नाही ....पण ज्याने कोणी लिहिली असेल त्याला सलाम ...!

तो बाप असतो...
तो बाप असतो
चांगल्या शाळेमध्ये पोरांना
टाकायची धडपड करतो
donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
......................तो बाप असतो

कॉलेज मध्ये सोबत जातो,
होस्टेल शोधतो स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
...........................तो बाप असतो

स्वतः टपरा mobile वापरून,तुमहाला stylish mobile घेऊन देतो
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
.......................तो बाप असतो

love marriage करायला कोणी निघाल तर
खूप चिडतो
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप ओरडतो
"बाबा तुम्हाला काही समजत का? "अस ऐकल्यावर खूप रडतो
................तो बाप असतो

जाताना पोरगी सासरी, धायमोकळून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
..............तो बाप असतो

वडिलावर खूप कमी कविता असतात म्हणून
कविता FORWARD
कर............
आणि वडिलांचे प्रेम जगाला कळूद्या
सहमत असाल तर नक्की FORWARD करा..

तानाजी मालुसरे

आज लढला सिंह कोंढाणा किल्ल्यासाठी ४//२/१६७०
त्या दिवशी वारे बरेच वाहत होते. देवासामोरील वात
फरफरत तेवत होती, जिजाऊ आपल्या बिछान्यावर
पहुडलेल्या. शिवबा त्यांचे पाय रगडित होते .
जिजाऊंची नजर आपल्या खिडकीतून समोर गेली .
आणी त्या ताडकन उठून खिडकीजवळ
उभ्या ठाकल्या मागोमाग राजे होतेच " काय झाले आऊ
साहेब" "शिवबा, शिवबा मोघली ध्वज
मिरवणारा कोंडाणा आमच्या डोळ्यात खूप दिवस सलत
आहे शिवबा शिवबा राजेंना हुकुमच
भेटला होता आईची आज्ञा शिरसावंद्य
मानणारा राजा इतक्यात महालाचे पडदे बाजूला सारून
एक धिप्पाड देहाचा माणूस आईसाब, राजं करीत आत
आला. तो होता तान्हाजी मालुसरे.
आपल्या मुलाच्या लग्नाच्या अक्षदा घेऊन
तो आला होता. तान्हाजी आले त्यांनी आऊसाहेबांचे
पाय शिवले महाराजांना मुजरा करीत गळाभेट घेतली. "
राजं आपली पायधूळ झाडायची पोराला सुनं
ला आशीर्वाद द्याया यायचे राजं बरका आऊसाहेब" पण
दरवेळी तेजपुंज दिसणाऱ्या राजांच्या चेहऱ्याचे तेज
इतरवेळी सारखे नव्हतं. आणि तान्हाजीला हे लगेच
जाणवलं. अहो जाणवणारच की बालपनाचं मैतर त्ये. "राज
काय झालं सगळी खैरीयत तर हाय न्हव.मी आल्या पासून
बघतोय काय तरी लपवतायीसा ह्या तान्ह्या पासून" "
अरे काही नाही तान्या" "न्हाय कसं काय तरी हाय राजं
आई तुळजा भवानीची शपत तुम्हास्नी काय त्येबोला"
तान्ह्या आम्हीं कोंढाणा सर् करायला जाणार आहोत
"काय त्ये जमायचे न्हाय राजं कोंडण्यावर आन म्या कुठ
घरी अजाबात न्हाय म्या जातो अन् कोंडाणा घेऊन
येतो का आता आमच्या तलवारी वर तुमचा इस्वास न्हाय"
"तसं नाही तान्हाजी" "अररं तान्ह्या येडा का खुळा तू
घरी लगीन काढलंय, पै-पाहुण जमल्यात, अन्न रांदतय,
दारात मांडव पडलाय, निविद दाखवलाय, औतन पोचल्यात
अन् तू मोहिमेवर गेलास तर जग हसलं राजांवर
वरबापाला काय तर मोहिमेवर धाडलाय" "वा आईसाहेब
कोपऱ्यापातूर वगळ यैस्तोवर आम्हीं भात
आमटी वरपायची, नवीन शेलं पागोटं घालून मिरवायचं
नाचायचं अन् आमचं राजं कुठ तर मोहिमवर आईसाब जग
हसल आम्हास्नी श्यान घालल तोंडात"
"तान्ह्या आदी रायबाचं लगीन पार पाड"
"नाही राजआधी लगीन कोंडाण्याचं मग
माझ्या रायबाचं" राजे हे काय पोर ऐकणाऱ्यातल न्हाय
तुम्ही द्या याला मोहीम आणि भांडून मोहिमेचे विडे घेऊन
हा सिंह मोहिमेवर गेला गेला तो परत न येण्यासाठीचं.
पाचशे मावळे सोबत घेऊन ते. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य
नवमी) रात्री राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य
गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन
पोचले. त्यांच्या लढाईचे सभासद बखरीतील वर्णन -
तानाजी मालुसरा हजारी मावळीयांचा होता. त्याने
कबुल केले किं, "कोंडाणा गड आपण घेतो." असें कबूल करून
वस्त्रें, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन
गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून
रात्रीं गडाच्या कड्यावरून चढविले. जैसे वानर चालून
जातात, त्याचप्रमाणे कड्यावर चालून गेले.
आणि कडा चढून, गडावर जाऊन, तेथून माळ लावून वरकड
लोक देखील तानाजी मालुसरा चढून, गडावर जाऊन, तेथून
माळ लावून वरकड लोक देखील तानाजी मालुसरा चढून
गडावरी तीनशे माणूस गेले. गडावरी उदेभान राजपूत होता.
त्यासी कळले की, गनिमाचे लोक आले. हि खबर कळून कुल
राजपूत कंबरकस्ता होऊन, हातीं तोडा बा घेऊन, हिलाल,
चंद्रज्योती लावून बाराशें माणूस तोफाची व तिरंदाज,
बरचीवाले, पटाईत, सु-या, आडहत्यारीढाला चढवून
चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी 'श्रीमहादेव!'
असेंस्मरण करून नीट फौजेवर राजपुतांचे चालून घेतले. मोठे
युद्ध एक प्रहर जालें पांचशे रजपूत ठार जालें. चाळीस
पन्नास मावले ठार जाले. उदेभान किल्लेदार
खासा त्यांशी व तानाजीमालुसरा सुभेदार यांशी गांठ
ओअडली. दोघे मोठे योद्धे त्यांशी व
तानाजी मालसुरा सुभेदार यांशी गांठ पडली.दोघे मोठे
योद्धे, महाशुर, एक एकावर पडले. वार करीत चालले.
तानाजीचे डावे हातची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास
आली नाहीं। मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल
करून, त्याजवरी वोढ घेऊन, दोघेमहारागास पेटले. मोठे
युद्ध केले. एकाचे हातें एक तुकडे होऊन फिरंगीच्या वारे
पडले. दोघे ठार जाले. मग सूर्याजी मालसुरा,
तानाजीचा भाऊ, याने हिम्मत धरुन, कुल लोक सांवरुन,
उरले रजपूत मा रले. कित्येक रजपूत कडे उडोन पळोनमेले.
असें बाराशे माणूस मारिले. किल्ला काबीज केला.
आणि गडावर पागेचे खण होते त्यांस आग लाविली.
त्याचा उजेड राजीयांनी राजगडाहून पाहिला आणी बोलले
किं गड घेतला. फत्ते जाली! असें जाहले टो जासूद दुसरे
दिवशी वर्तमान घेऊन आला किं,
"तानाजी मालसुरा यांनी मोठें युद्ध केलें. उदेभान
किल्लेदार यास मारिलें आणि तानाजी मालसुराही पडला"
असें सांगितले. गड फत्ते केला असें सांगताच राजे म्हणूं
लागले किं, " एक गड घेतला, परंतु एक गड गेला!" असें
तानाजीसाठी बहुत कष्टी जाहले. पुढे गडावरी ठाणे
घातले. सूर्याजी मालसुरा भाऊ नावाजून
त्याचा सुभा त्यास सांगितला. धारकरी लोकांस बक्षिसे
सोन्याची कडी दिलीं.द्रव्य अपार दिलें. वस्त्रें जरी कुल
लोकांस दिलीं. ये जातीने प्रथम कोंडाणा घेतला.