स्वप्न पाहिलं एक ,
तुझी साथ हवी सुरेख ,
तुझ्या प्रेमाचा तो रंग जसा,
त्याने उमटवला हृदयावर ठसा ,
थोडस जवळ आहेस वाटतंय ,
पण , हळूच दुरावा जाणवतोय ,
आज खरच वेडा झालोय ,
सगळे जग आज भूललोय ,
खूप सहन करतोय दुरावा ,
वाटतंय , तुझा हात-हाती हवा ,
वेळ जात आहे खूप अवघड ,
तुझ्या भेटीची लागलीय ओढ ,
मला आज-आता समोर हवीस …
थोड लाजत लाजत , पण ,
माझ्याकडे बघावीस …….
No comments:
Post a Comment
Your Review Comment Here