Wikipedia

Search results

Saturday, 1 March 2014

Love You sister

एक बहिण असावी.
मोठी ,लहान , शांत ,खोडकर
कशीही असावी पण एक बहिण असावी.
मोठी असेल तर आई बाबांपासून वाचवणारी,
लहान असेल
तर आपल्या पाठीमागे लपणारी.
मोठी असल्यास गुपचूप
आपल्या pocket मध्ये पैसे ठेवणारी. लहान असल्यास
चुपचाप काढून घेणारी.
लहान असोवा मोठी,
छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी. एक बहिण
प्रत्येकाला असावी.
मोठी असल्यास आपलं चुकल्यावर कान ओढणारी.
लहान
असल्यास
तिचं चुकल्यावर "sorry दादा " म्हणणारी.
लहान असोवा मोठी आपल्या एकाध मैत्रिणीला "वहिनी "
म्हणून हाक
मारणारी.
एक बहिण प्रत्येकाला असावी.
मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा shirt
आणणारी, लहान असल्यास प्रत्येक पगारात
आपल्या खिशाला चंदन
लावणारी.
ओवाळणी काय
टाकायची हे
स्वतः ठरवत असली तरीही तितक्याच ओढीने
राखी पसंत
करून आणणारी. एक बहिण प्रत्येकाला असावी. कठीण
प्रसंगी खंबीर राहील स्त्री शक्तीच ती ,
स्वतः पेक्षा हि जास्त आपल्यावर प्रेम
करणारी प्रत्येकाला एक
बहिण असावी......!!!

No comments:

Post a Comment

Your Review Comment Here