Wikipedia

Search results

Monday, 22 September 2014

आ गया फिर से चुनाव

Written By: SUNILKUMAR PARIT

आ गया फिर से चुनाव

अब पाँच साल गुजर गये
आ गया फिर से चुनाव
अब शायद नेता फिर से बनेंगे
भिखारी भिखारी भिखारी ॥

अब देखो तलवे भी चाटेंगे
सच पैरों तले गिडगिडायेंगे
खुद को सेवक और कहे राजा
जनता जनता जनता ॥

नादान जनता चुनती इनको
बाद में देखे हाल ही उलटा
भिखारी बनते हैं राजा सब देखे
तमाशा तमाशा तमाशा ॥

पूछें ऐसा क्यों वक्त का नजारा
जनता के पास नहीं है जवाब
भिखारी नहीं बोलेंगे अब वे हैं
शासक शासक शासक ॥

अब वे इतने ईमानदार हैं यारों
सबकुछ निगलकर ऐसे खडे हैं
तोंद हाथी सा अब पाँच साल सोयेंगे
कुंभकर्ण कुंभकर्ण कुंभकर्ण ॥

अब फिर से वही रट लगायेंगे
गिडगिडायेंगे रोयेंगे हम सहेंगे
बेहतर है अब दिखा दे अंतिम
संसार संसार संसार ॥

Sunday, 21 September 2014

मन वढाय वढाय

poet Bahinabai Chaudhari
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर ।
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।

मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा ।
जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।

मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? ।
उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।

मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे ।
इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।

मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?।
आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।

मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर ।
तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।

मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना ।
मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥

देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात ।
आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥

देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं ।
कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥

अरे, संसार संसार

poet Bahinabai Chaudhari

अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर !

अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं

अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !

अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड

अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे

ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन्‌ दुःखाले होकार

देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !

अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार

असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार !

आज मला खूप एकट वाटतय

आज मला खूप एकट वाटतय.,

कुणाच्या तरी जवळ
 बसावस वाटतय...,

कोणाशी तरी खूप खूप
 बोलावस वाटतय...,

अन मनात चाललेल सगळ
 काही सांगावस वाटतय...

आज परत एकदा तिला
 पहावस वाटतय...,

आज मला खूप खूप
 रडावस वाटतय....,

स्वतःशी परत खूप
 भांडावस वाटतय...,

भरलेल्या डोळ्याने...,

आरश्या समोर
 बसावस वाटतय...,

अन् आपलं कोणीच
 नाही म्हणून..स्वतःचेच
 डोळे पुसावंस वाटतय...,

आज मला परत भूत-काळात
 जावस वाटतय..परत एकदा
 आठवणींत जगावस वाटतय..

Saturday, 20 September 2014

स्वाभिमान

राजकारणात पाठीशी उभारा ,
कुणालाही पाठींबा द्या ,
पण स्वत:चा स्वाभिमान कुठे विकू नका ……
कारण , स्वाभिमान विकला  गेला तर,
जनावरात आणि आपल्यात फरक राहणार नाही …।

Friday, 19 September 2014

तुझी साथ


स्वप्न पाहिलं एक ,
तुझी साथ हवी सुरेख ,
                                        तुझ्या प्रेमाचा तो रंग  जसा,
                                      त्याने उमटवला हृदयावर ठसा ,
 थोडस जवळ आहेस वाटतंय ,
पण , हळूच दुरावा जाणवतोय ,
                                             आज खरच वेडा झालोय ,
                                              सगळे जग आज भूललोय ,
खूप सहन करतोय दुरावा ,
वाटतंय , तुझा हात-हाती हवा ,
                                                वेळ जात  आहे खूप अवघड ,
                                                 तुझ्या भेटीची लागलीय ओढ ,
मला आज-आता समोर हवीस …
थोड लाजत लाजत , पण ,
माझ्याकडे बघावीस …….